वागदरी , दि . ८ :
राजमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाच्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या त्यागामुळेच एके काळी समाज व्यवस्थेची गुलाम असलेल्या स्त्रीयाना आज माना सन्मानाचे जीवन मिळाले आसल्याचे मत जि.प.प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील सहशिक्षका सुषमा सांगळे यांनी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथे कर्तव्यदक्ष महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगळे ह्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे ह्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.प.सदस्या विद्याताई बिराजदार, जेष्ठ कार्यकर्त्या शीला बिराजदार, कृषी सखी कोमल झेंडारे आदी होते.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सहशिक्षका सुषमा सांगळे, मनिषा चौधरी, अंगणवाडी सेविका पद्ममीनीबाई पवार, मदतनीस रुपाली जाधव, आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे एस.के.गायकवाड, किशोर धुमाळ, सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार, शालेय व्यवस्थापण समितीचे सदस्य प्रमोद सोमवंशी आदीसह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.