नळदुर्ग ,दि . ०८


नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी   जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. 



त्याचबरोबर  राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने  आझाद महाविद्यालय औसा येथील प्राध्यापिका वृंदावनी गायकवाड यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले होते. 
महाविद्यालयाच्या परिसरात महिलांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. आजच्या संपन्न झालेल्या कार्यक्रमात पोलिस प्रशासनातील रोहिणी चव्हाण, सुवर्णा गिरी, अन्नपूर्णा कुंभार, आरोग्य विभागातील सुमन फुले, संगीता उकिरडे, शैक्षणिक विभागातून मंगल भुरे, बँकिंग क्षेत्रातून मेघना तेंडुलकर, आणि महाविद्यालयातील डॉ. जयश्री घोडके डॉ. रोहिणी महिंद्रकर, प्रा. झरीना पठाण, प्रा. संगीता मोरे, सेवानिवृत्त प्रा. इंदुमती भोरे, डॉ. लक्ष्मीबाई मनशेट्टी, डॉ. संगीता सरवदे व विद्यार्थिनी वैष्णवी जगदाळे व प्रियंका कांबळे यांचा सन्मान  प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, नॅक समन्वयक डॉ. मनोज झाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष राठोड  यांच्या हस्ते करण्यात आला. 
   

नारीचा सन्मान करणं आणि त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव करणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज प्रत्येक क्षेत्रात  महिला काम करत आपलं कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. याचा अभिमान आहे असे  प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी सांगितले.

 सुमन फुले व  निवृत्त प्रा. इंदुमती भोरे यानीही  मनोगत व्यक्त केले.  यावेळी डॉ. दीपक जगदाळे, डॉ. दयानंद भोवाळ, निळु राठोड, प्रमोद कांबळे, सिद्धू सुतार, सुरेश गायकवाड, लिंबराज बेले, दिनेश पुदाले, भागीनाथ बनसोड, उमेश सर्जे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष पवार यांनी मानले.  
 
Top