काटी , दि . ८

तामलवाडी ता.  तुळजापूर  पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे यांना पंचायत समिती संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातील पंचायत समिती सदस्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोमवारी  जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशन,पुणे महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने देण्यात येणारा  मार्च 2022 मधील राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.


  केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे सभागृह,पुणे येथे  त्याना पूरस्कार देण्यात आला.  पं.स. सदस्य दत्ता शिंदे यांनी मागील पाच वर्षांपासून पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समिती संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातील पंचायत समिती सदस्यांसाठी व गणातील गावात जनतेशी संपर्क ठेवून विकासात्मक व सामाजिक कामे करून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
    

या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील टॉप दहा जिल्हा परिषद सदस्य, टॉप पाच जिल्हा परिषद अध्यक्ष, टॉप तीन पंचायत समिती सभापती, उपसभापतींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.  शिंदे याना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आभिनंदन  होत  आहे.
     

यावेळी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील, उदय बने, शरद बुट्टे पाटील,अमृता पवार, 
विजय शिवतारे, केंद्रे,भारत शिंदे
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती,पंचायत समिती सभापती,सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top