नळदुर्ग ,  दि . ८ : विलास येडगे


 नळदुर्ग येथे दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ, नवी मुंबई आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिराचे आयोजन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावतीने करण्यात आले होते. या शिबिराचा नळदुर्ग शहरातील नागरीकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला.
या शिबिराचे आयोजन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आयोजित केले होते. नळदुर्ग येथील मल्लिकार्जुन मंदिरात आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन डॉ. स्वाती पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापुर पंचायत समितीच्या सभापती रेणुकाताई इंगोले या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन एस. बी. आय. बँकेच्या मेघना तेंडुलकर, सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद, सुभद्राताई मुळे, पुजा उमेश जाधव,उमा दयानंद जाधव, हेमलता काटकर, निलावती गायकवाड व शैलजा भस्मे, माजी नगराध्यक्षा सुफीया कुरेशी, डॉ. अजित निळे व शिवाजीराव मोरे हे उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर शहर भाजपच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
   

  यावेळी बोलतांना डॉ. स्वाती पाटील यांनी म्हटले की तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने आयोजित केलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा. महिलांनी कुठलेही आजार अंगावर न काढता वेळीच त्यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या शिबिरात महिलांची संख्या कमी असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. महिलांनी आशा शिबिरांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याची आज गरज आहे. कुठल्याही आजारावर पहिल्या स्टेप मध्ये उपचार झाले तर तो लवकर बरा होतो असेही डॉ. स्वाती पाटील यांनी म्हटले. यावेळी सभापती रेणुकाताई इंगोले, सुभद्राताई मुळे, शाहेदाबी सय्यद यांचीही भाषणे झाली.
      

या शिबिरात मुंबई येथील तज्ञ डॉ. अजित निळे, डॉ.अमातुल्ला मर्चंट डॉ. शाईस्ता खान, डॉ. कायती मेघनानी डॉ. मानसी कुरले, डॉ. कृतिका पाटणकर, डॉ. परवीन सय्यद व जनसंपर्क अधिकारी विनोद ओहळ यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले.
    
यावेळी ह्रदयरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान--नाक--घसा, अस्थिरोग व पोटाचे विकार यावर उपचार करण्यात आले. या शिबिरामध्ये अनेक नागरीकांनी उपचार करून घेतले.
       हे शिबीर यशस्वी होण्यासाठी भाजपाच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर,भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, शहर भाजपा अध्यक्ष धीमाजी घुगे, पद्माकर घोडके, सुनिल बनसोडे, गणेश मोरडे, सिकंदर काझी, गौस शेख, रियाज शेख, एस. के. बागवान, अबुलहसन रजवी व विशाल डुकरे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार सुनिल बनसोडे यांनी मानले.
 
Top