नळदुर्ग , दि . ०८ :
येथिल भुईकोट किल्ल्यात मंगळवारी राष्ट्रीय महिला दिन उत्सात साजरा करण्यात आला.
युनिटी मल्टीकॉन्स कंपनी सोलापूर यांच्या वतीने आज नळदुर्ग किल्या मध्ये राष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्सात साजरा करण्यांत आला. युनिटीच्या वतीने किल्ल्याचा कारभार महिलांच्या हाती देण्यात आला .
सुरुवातीला किल्ल्यात काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचारी यांचा कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी व कंपनीचे जनसंपर्क आधिकारी विनायक अहंकारी यांनी सत्कार करून सन्मान केला. महिला दिनाच्या निमित्ताने नळदुर्ग शहरातील पत्रकार यांच्या कुटुंबांना किल्ल्याची सहल आयोजीत कलेली होती. यानिमित्ताने किल्यात सर्व ठिकाणी फिरून त्यांना माहिती देण्यात आला.
प्रारंभी सर्व मान्यवर महिलांचा कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय महिला दिनांच्या निमित्ताने किल्ला पाहण्यास आलेल्या सर्व महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकार विलास येडगे..पत्रकार सुहास येडगे ,पत्रकार शिवाजी नाईक , उत्तम बणजगोळे , सुनिल गव्हाने , अजय चव्हाण , शोहेब काझी व युनिटी कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.