लोहगाव , दि . ८
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील मातोश्री जिजामाता विद्यालयाच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिलाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अलका शिवाजी मारेकर,तर प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मारेकर,सरपंच लोचना दबडे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कावळे, मुख्याध्यापिका सौ.प्रतीभा पवार ह्या उपस्थित होत्या.
यावेळी ज्योती माने, शशिकला थोरत,लक्ष्मी गायकवाड, रुक्मिणी लांडगे,संगीता देशमुख, पूजा मारेकर, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थींनी रूचिता पाटिल तर आभार अंकिता मारेकर यांनी मानले, कार्यक्रमासाठी सहशिक्षक नेताजी क्षिरसागर,शेखर कलशेट्टी,नागनाथ जमादार, के.व्हि .स्वामी,कर्मचारी संजय मारेकर, वनिता मारेकर,अलम तांबोळी, परमेश्वर चौधरी,विठ्ठल बनसोडे यांनी परिश्रम घेतले.