तुळजापूर,दि.३०:
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वच्छ ग्राम व आरोग्य संवर्धनासाठी युवा हे विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे तिर्थ खुर्द येथे दि.२५ ते ३१ मार्च या कालावधीत संपन्न होत आहे,शिबिरादरम्यान तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय यांच्या सहयोगाने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
सदर आरोग्य तपासणी कार्यक्रमामध्ये एकुण ३२ व्यक्तिंचे शुगर, रक्तदाब व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली, यावेळी जिल्हा उपरुग्णालय तुळजापूर येथील मुख्य अधिक्षक डॉ जाधव, डॉ शेख, आरोग्य कर्मचारी भाग्यश्री हिरमेठ, जगदाळे यांच्या सह तिर्थ खुर्द येथील उपसरपंच रामदास पवार , तसेच सरपंच बिरुदेव सोनटक्के ,मयुर जाधव यांचे सहकार्य लाभले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम भाग एक चा विद्यार्थी अभिषेक लसने याने केले तर आभार कु पूजा लिंगफोडे हिने मानले,सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा चव्हाण व्ही एच,प्रा एस.पी वागदकर,प्रा.डॉ.एम.आर आडे, प्रा.बी.जे कुकडे,प्रा.डॉ.बी डब्ल्यू गुंड,प्रा.बी.जे कुकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला, यावेळी सर्व स्वयंसेवक, तसेच मोठ्या प्रमाणात तिर्थ खुर्द येथील रहिवासी उपस्थित होते.