नळदुर्ग , दि . ३०
सर्व्हिस रस्तालगत नालीचे काम सुरु
सर्व्हिस रस्ता,नाली,व स्ट्रीट लाईटचे काम तात्काळ सुरु करा अन्यथा आंदोलन करण्याचा मनसेने दिला होता इशारा
नळदुर्ग शहरातून गोलाई-ते अक्कलकोट हा महामार्ग करताना,शहराच्या मुख्यमार्गाला जोडणारा सर्व्हिस रस्ता व नालीचे काम रखडले होते. त्यामुळे सांडपाणी महामार्गावर येत आहे. त्याच कारणाने दि .१२ मार्च रोजी एका दुचाकीस्वाराचा बसस्थानकासमोर अपघात झाला होता,सांडपाण्याला वळण देत असताना पाठीमागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने त्या अपघातग्रस्ताचा मृत्यु झाल्याचे सर्वश्रुत आहे. ,या अपघातास जबाबदार कोण?असा प्रश्न मनसेने उपस्थित केला होता. अशा घटना टाळण्यासाठी सर्व्हिस रस्ता,नाली याचे काम विनाविलंब तात्काळ सुरु करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय महामार्ग सोलापुर विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिला होता . त्याची दखल घेवुन संबंधित विभागाने अर्धवट असलेल्या नालीचे काम सुरु केले आहे.