नळदुर्ग दि. ३०
काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन संजीवनी मेडिकल स्टोअर्स नळदुर्ग व
8 फार्मा ग्रुप अणदूर-नळदुर्ग-जळकोट यांच्यावतीने नागरिकासाठी बुधवारी नळदुर्ग येथे पाणपोईचा शुभारंभ करण्यात आले.
यावेळी नळदुर्ग पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे व माजी नगरसेवक सुधीर हजारे यांच्या हास्ते जलचे (पाण्याचे जार ) पुजन करुन श्रीफळ वाढवुन आणि फित कापुन शुभारंभ करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ पञकार विलास येडगे, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, लतीफ शेख, अजित चव्हाण, अमर भाळे, शोएब काझी, अजय अणदूरकर, संजय दशरथ जाधव, गोविंद शिंदे, जीवन मोजगे, महेश कारले, रविंद्र कानडे, पंकज नरवडे, हिराजी गायकवाड, राम जाधव आदि उपस्थित होते.