वागदरी , दि . ३१


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील सहशिक्षिका सुषमा सांगळे यांची अन्यत्र बदली झाल्याने येथील विद्यार्थी व ग्रामस्थ पालकांनी सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देवून निरोप दिला.



  सहशिक्षिका सुषमा सांगळे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्हा बदली होऊन जून २०१८ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील वागदरी ता.तुळजापूर येथील जि.प.प्राथमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून रूजू झाल्या होत्या.त्या एक उपक्रमशिल शिक्षिका असून साहित्य निर्मितीची त्यांना आवड आहे. त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित असून   त्यांचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत.

 त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.अल्पावधीतच त्यांनी   विद्यार्थी प्रिय  शिक्षिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  शासनाच्या तांत्रिक आडचणीमुळे त्यांची वागदरी येथून जि.प.प्राथमिक शाळा मानेवाडी ता.तुळजापूर याठिकाणी  बदली झाली आहे. त्याची बदली झाल्याचे कळताच शालेय व्यवस्थापन समिती  अध्यक्ष रामसिंग परिहार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छासह निरोप देण्यात आला. 
  
यावेळी ग्रा.प.सदस्य दत्ता सुरवसे, रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड,बाळू पवार, मुख्याध्यापिका महादेवी जते,सहशिक्षिका एम.आर. चौधरी,अंगणवाडी सेविका पद्ममीनीबाई पवार, सहशिक्षक तानाजी लोहार, किसन जावळे, पत्रकार सतिश राठोड, सह विद्यार्थी, पालक, व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top