नळदुर्ग ,दि . ३१


तुळजापूर तालुक्यातील   कुन्सावळी येथे नाली बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे.

गावातील काळनाथ कट्टा,ग्रामपंचयत ,पाणीटाकी ते तालीम पर्यंत ,श्री.हनुमान मंदिर समोर भुमीगत 28 पाईप टाकून नालीचे काम चालू करण्यात आले . या कामाचे सुरुवात  सरपंच सौ.कविता शणमुख गायकवाड यांच्या  हास्ते पुजन करुन करण्यात आले .यावेळी ग्रामसेवक  स्वामी  गावातील नागरिक नरसु रुपनुर , सखाराम जंगालेसह नागरिक  उपस्थित  होते .

        मजबुतीकरणाच्या कामास प्रांरभ
 
 पाझर तलाव क्र. 2 व पाझर तलाव क्र. 4 चे मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे . या कामाचे शुभारंभ  सरपंच सौ.कविता शनमुख गायकवाड , उपसरपंच सौ.रुपाली अर्जुन शिंदे यांनी केले. यावेळी सिंदगावचे सरपंच विवेकानंद मेलगिरी  शिंदे , जयराम वायकर , अर्जुन शिंदे , नरसु रुपनूर ,  बाबा शिंदे , रघुआप्पा कोकरे ग्रामसेवक स्वामी  आदी उपस्थित होते.

 
Top