तुळजापूर, दि . ३१: डॉ .सतीश महामुनी
तुळजाभवानी मंदिर प्रवेशासाठी सुरू असलेले ॲक्सेस पास बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार सौ. योगिता कोल्हे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी निवेदन दिले.
निवेदनात तुळजाभवानी देवीचे पंचामृत अभिषेक पूर्वीप्रमाणे सुरू करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची मागणी केली आहे. वयोवृद्ध आणि लहान मुलांना खूप त्रास होतो त्यामुळे प्रवेश पास बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे .यावेळी युवक शहर अध्यक्ष नितीन रोचकरी, ज्येष्ठ नेते दिलीप मगर , अण्णासाहेब क्षीरसागर , गोरख पवार , समर्थ पैलवान, रोहित चव्हाण , मयूर दराडे , आदित्य शेटे , रणजित उंबरे , पुष्कराज शिंदे , संकेत साळुंके , विजय बोधले उपस्थित होते. भाविकांना या योजनेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया या निमित्ताने विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी पत्रकारांना दिली.