काटी , दि . ०२
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून काटी-तुळजापूर रस्त्यालगत सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लाडूळकर,उद्योजक परमेश्वर लाडूळकर,ज्ञानेश्वर लाडूळकर यांच्या वतीने त्यांच्या सागर ॲटोमोबाईलसमोर मातीचे मोठे रांजण ठेवून जाणाऱ्या येणाऱ्या पादचा-याना निःशुल्क 'पिण्याचे पाणी ' मिळावे व कोणास चांगले पिण्याचे पाणी पाजणे हे हिंदू धर्मानुसार पुण्याचे काम समजले जाते. या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, सुभाष साळुंके, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लाडूळकर आदी मान्यवरांच्या हस्ते 'पाणपोई' चे उद्घघाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, सुभाष साळुंके, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लाडूळकर, पत्रकार उमाजी गायकवाड, नाबाजी ढगे,बबन हेडे, संजय आदलिंगे,रावसाहेब गुंड, मोहन शिंदे, परमेश्वर लाडूळकर, ज्ञानेश्वर लाडूळकर,बळी चवळे, दशरथ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.