काटी , दि . ०२
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा अकलूज येथील सुप्रसिध्द जबीन नर्सिंग हॉस्पिटलचे डॉ.अतिक अहमद काझी (काटीकर ) यांचे शुक्रवार सकाळी 11 वाजता अकलूज येथे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यां
चे कुटुंबीय औरंगाबाद येथे स्थायिक असल्याने त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संध्याकाळी औरंगाबाद येथील मुस्लिम स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. ते काटी येथील वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी घेणारे पहिले डॉक्टर होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी, तीन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.