बीड , दि . २५ :
मुबंई शिवसेना भवन येथे सहकार सेनेच्या राज्य अध्यक्षा शिल्पा सरपोतदार यांनी पंकज कुटे यांना बीड जिल्हा सहकार सेनेचे जिल्हासंघटक पदाचे नियुक्तीपत्र दिले.
सहकार सेना शिवसेनेची अंगीकृत संघटना असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सहकार क्षेत्रात वाढविण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे , मराठवाडा विभागीय समन्वयक विश्वनाथज नेरूरकर यांच्या आदेशानुसार शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पा सरपोतदार, उपाध्यक्ष प्रदिपकुमार खोपडे, सरचिटणीस विशाल तांबे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीड जिल्हा सहकार सेनेच्या जिल्हा संघटकपदी पंकज कुटे यांची निवड केली.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख उल्हास गिराम, सरपंच प्रदिप कोटुळे, चंदुनाना कागदे, शुभम घोडके यांची उपस्थिती होती.