नळदुर्ग , दि .२५ :
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जेष्ठ नागरिक रत्नाबाई शंकर गुड्ड वय (९०) यांचे दि . २५ मार्च रोजी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. अणदूर येथील दै सकाळचे पत्रकार चंद्रकांत गुड्ड यांच्या त्या मातोश्री होत.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावच्या शिवारात त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंतीम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पञकार बांधवासह विविध मान्यवरानी श्रध्दाजली आर्पित केली.