तामलवाडी , दि. २ :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मल्लिकार्जुन मसुते हे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी व सध्या लातूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ वैभव कवडे , प्रा श्रीकांत माळी, संस्थेचे अध्यक्ष बसवराज मसुते, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव यशवंत लोंढे ,संचालक बाळासाहेब जगताप, गोरख माळी, अब्बास पटेल , सोसायटीचे गटसचिव सुधाकर लोंढे ,पालक चंद्रकांत घोडके, नागनाथ मसुते ,प्राचार्य सुभाष जाधव, पर्यवेक्षक गणेश हलकरे, काशिनाथ रामपुरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी विद्यार्थी चैत्राली घोडके, श्रीशैल मसुते, पूजा जाधव ,स्नेहा कदम या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत साळुंखे यांनी केले. डॉ. वैभव कवडे यांनी वैद्यकीय क्षेत्रा विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर प्रा श्रीकांत माळी यांनी " पुढील भावी काळात विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा तसेच ज्याप्रमाणे एखादा तलाव तयार केल्यानंतर पावसाचे पाणी एकत्रित केले जाते व त्या तलावाच्या परिसरातील सर्व शेती सुजलाम सुफलाम होते. लोक सधन व सुखी समाधानी होतात. त्याचप्रमाणे या तामलवाडी येथील सरस्वती परिवाराने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र याच्या सरहद्दीवर सरस्वती विद्यालयाच्या माध्यमातून एक ना एक ज्ञानसागर तयार केला व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य केले व त्यातूनच अनेक हिरे तयार झाले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे, चंद्रकांत साळुंखे , चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, लक्ष्मण पाटील ,सुहास वडणे ,महादेव माळी, गिरीश जाधव ,योगेश राऊत ,महादेव मसुते, बालाजी साठे ,विनोद कुंभार प्रशांत चुंगे ,श्रीगणेश स्वामी ,बालाजी रणसुरे , शहीदा पिरजादे ,मनीषा गिरे ,विठाबाई पाटील ,मनीषा सावंत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वडणे तर चांगदेव सावळे यांनी आभार मानले.