एसपी शुगर अँड ॲग्रो प्रा. लिमिटेड आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद यांच्याकडून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अहमदनगर येथील आपलं घर संस्थेची 'दोरखंड' ही एकांकिका गंगाधर करंडकची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली .दोरखंड व इतर सर्व विजेत्यांना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व एस पी शुगरचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि२८) सायंकाळी बक्षीस वितरण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते ,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कसबे तडवळे येथील एस पी शुगर आणि अखिल भारतीय नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेकडून उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील 39 संघांनी सहभाग नोंदविला.२६,२७ व२८ फेब्रुवारी असे तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातील ४० पेक्षा जास्त नाट्यसंस्थानी एकापेक्षा एक सरस एकांकिका सादर केल्या मंगळवारी या स्पर्धेचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व एस पी शुगर चे चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करुन समारोप करण्यात आला .सांघिक स्पर्धेत अहमदनगर येथील आपलं घर या संस्थेने सादर केलेल्या दोरखंड या एकांकिकेला ७१ हजार रुपये रोख व गंगाधर करंडक हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
मुंबई येथील इव्हेंट्सच्या लाडाची लेक ला द्वितीय (५१ हजार व करंडक), डोंबिवली येथील ॲब्स्ट्रकला तृतीय(४१ हजार व करंडक), अहमदनगर येथील प्रेमचंद सारडा महाविद्यालयाच्या सहलला चतुर्थ (२५ हजार व करंडक), तर उस्मानाबाद येथील नाट्य व लोककला विद्यापीठ विद्यापीठाने सादर केलेल्या पाऊस या एकांकिकेला पाचवे (१५हजार व करंडक) बक्षीस मिळाले. याशिवाय वैयक्तिक बक्षिसात प्रकाश योजनेसाठी नाट्य व लोककला उस्मानाबाद प्रथम इव्हेंट्स मुंबई व एप्स ट्रेक आर्ट डोंबिवली तृतीय संगीत संयोजनासाठी सूर्योदय लातूर प्रथम इव्हेंट्स मुंबई द्वितीय तर नाट्य व लोककला उस्मानाबाद फक्त साठी आपलं घर अहमदनगर प्रथम प्रेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर द्वितीय इव्हेंट्स मुंबई लेखनासाठी मुंबई प्रथम आपलं घर अहमदनगर द्वितीय व जेंट्स जेंट्स मुंबई तृतीय दिग्दर्शनासाठी दोरखंड एकांकिकेचे दिग्दर्शन करणार्या मोनिका बनकर हिला प्रथम लाडाची लेख चे दिग्दर्शन करणारे प्रतीक मोहिते व करिष्मा गुरव यांना द्वितीय तर हायब्रीड साठी दिग्दर्शन करणारे नितीन सावळे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. स्त्री अभिनयासाठी नीनु सहानी अहमदनगर प्रथम,गौरी डांगे तृतीय पुरुष अभिनयासाठी स्वराज अपुर्वा अहमदनगर प्रथम, साई निरपणे मुंबई द्वितीय डॉ संतोष कुलकर्णी लातूर यांनी पारितोषिक पटकावले या सर्व यशस्वी स्पर्धक आणि संघांना स्पर्धा संपल्यानंतर रात्री उशिरा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
याप्रसंगी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम करणारे डॉक्टर सुधीर कदम शलाका गाडे व अशोक बंडगर यांचा जिल्हाधिकारी दिवेगावकर व कारखान्याचे चेअरमन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सल्लागार डॉक्टर अभय शहापूरकर नाट्यपरिषदेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष विशाल शिंगाडे व राजेंद्र अत्रे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल शिंगाडे यांचे सहकारी सागर चव्हाण मनोज गावडे विशाल ढोने रोहित कुलकर्णी सुरज सोनवणे ताहेर शेख सुहास झेंडे कमलताई चव्हाण अजय चिलवंत डॉक्टर दिलीप माने व नाट्य परिषदेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.