नळदुर्ग , दि . ०२ : विलास येडगे
दि.१ मार्च रोजी श्री महाशिवरात्रीचा उत्सव नळदुर्ग येथील प्राचिन व पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी रामतीर्थ येथे असलेल्या श्री महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त रात्री १ हजार ८ तुपाचे दिवे लावण्यात आले होते यामुळे मंदिर उजळुन निघाले होते. तुपाच्या दिव्यामुळे मंदिर परीसरात तुपाचा सुगंध दरवळला होता.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. याठिकाणी श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी नळदुर्ग शहर व परीसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर रात्री ९ ते पहाटे ५.३० पर्यंत याठिकाणी मंत्रोच्चारात श्री महादेवावर रुद्राभिषेक, जलाभिषेक व दुग्धभिषेक करण्यात आला.विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग येथील रामभक्त प्रभाकर घोडके, माजी नगरसेवक सचिन डुकरे, ॲड. धनंजय धरणे, महाराजांचे पुत्र राम शर्मा, रोहित मोटे, सचिन भोई, सागर कलशेट्टी यांच्यासह नळदुर्ग व रामतीर्थ येथील जवळपास १०० महिलांच्या उपस्थितीत श्री महादेवावर रुद्राभिषेक, जलाभिषेक व दुग्धभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर ११ वेळेस रुद्रपाठ व ११ वेळेस आरती करण्यात आली. यानंतर पहाटे ५.३० वा. महाआरती झाल्यानंतर महाशिवरात्रीची सांगता करण्यात आली. नगरसेवक बसवराज धरणे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव हेही मंदिरात कांहीकाळ उपस्थित होते.
श्री क्षेत्र रामतीर्थ हे अतीशय पवित्र व प्राचिन क्षेत्र आहे याठिकाणी श्री प्रभु रामचंद्र दोन वेळेस येऊन गेले आहेत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे क्षेत्र आहे. विष्णु शर्मा महाराज तसेच नळदुर्ग येथील रामभक्त प्रभाकर घोडके, सचिन डुकरे, श्रीकांत पोतदार, रोहित मोटे, सचिन भोई, यांच्या सध्या होत असलेल्या प्रयत्नामुळे श्री क्षेत्र रामतीर्थचा लवकरच होऊन हे क्षेत्र देशात नावारूपाला येण्याची शक्यता आहे. याठिकाणी सध्या विकास कामे सुरू करण्यात आली आहेत.