अणदूर , दि . ०२
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जागर महिला मंडळाची एक दिवसाची "चला जाऊ या निसर्गाच्या सानिध्यात"सहल आयोजित करण्यात आली त्याला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील जागर महिला मंडळ वर्षभर महिला साठी विविध कार्यक्रम आयोजित करीत असते, त्याचाच एक भाग म्हणून मंडळाच्या 40 सदस्य महिलांची सहल तांदुळवाडी येथील,कल्याणम कृषी पर्यटन केंद्र येथे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाचा आनंद घेणार आहेत, जागर महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ अनिता यांच्या नेतृत्वाखाली ही एक दिवसीय सहल काढण्यात आली असून निसर्ग शेती, फुल शेती,ग्रामीण व कृषी संस्कृतीचा अभ्यास या महिलांना माहीत व्हावा म्हणून ही सहल काढण्यात आली असल्याची माहिती बाबई चव्हाण यांनी दिली, या सहलीमध्ये मीरा घुगे, अनुराधा पापडे, सुषमा शिंदे, श्रद्धा मुळे, डिंपल अगरखेड, कोमल बिच्चे,सुनीता ढेपे,शोभा पाटू आदी महिलांसह जागर महिला मंडळाच्या इतर सदस्या सहभागी झाल्या होत्या.