अणदूर , दि . ०२
अपयश आल्याने खचून न जाता, निराश न येता सामर्थ्याने त्याला सामोरे जा,यश मिळवण्यासाठी अंजन हे डोळे स्वच्छ करते, त्यामुळे अपयश हे डोळ्यातील अंजन समजुन विद्यार्थ्यांनी यशस्वी मार्गक्रमण करावे असे मत मिसेस महाराष्ट्र सौंदर्या पुरस्कार प्राप्त प्रतिभा घुगरे यांनी व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथिल जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा गावचे सरपंच रामचंद्र आलुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी, निवृत्त पोलिस आयुक्त सुरेश कंदले, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक चिंचोले,पुणे येथील अविनाश दाणी, प्रा सुर्यकांत आगलावे, प्रा चांगदेव गायकवाड, चंद्रशेखर कंदले, राजकुमार स्वामी, गुंडेशा गोवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रतिभा घुगरे म्हणाल्या की, जवाहर विद्यालयांनी मला चांगल्या संस्काराची शिदोरी दिली आहे,त्यांनी मला घडविले, विविध कला गुणांना वाव दिला, त्यामुळे आज माझा यशस्वी प्रवास सुरू आहे, यासाठी स्वताला मी भाग्यशाली समजते,"आम्ही चालवू हा पुढे वारसा" या गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन नेतृत्व गुण विद्यार्थ्यांनी विकसित करावे असे आवाहन शेवटी केले.
यासाठी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले तर याच विद्यार्थ्यांनी शाळेला इमारत निधी सुपूर्द केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवाहर विद्यालयाचे प्राचार्य सुरेश ठोंबरे यांनी केले सुत्रसंचलन लिंबाजी सुरवसे यांनी तर आभार मकरंद पाटील यांनी मानले