वागदरी , दि . १४ :एस.के.गायकवाड:
जागतिक महिला दिनानिमित्त वागदरी ता. तुळजापूर येथील महिला स्वयंसहाय्यता गटाला महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नळदुर्गच्या वतीने कर्ज वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या उमेद आभियाना अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे सुरु करण्यात आलेल्या रमाई महिला स्वयंसहाय्यता गट व बिस्समिल्ला महिला स्वयंसहाय्यता गटाला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी बँकेचे शाखाधिकारी नितीन दासरवाड यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देवून उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांना बँकेच्या वतीने अर्थसहाय्य देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मत शाखाधिकारी नितीन दासरवाड यांनी व्यक्त करुन वागदरी येथील रमाई व बिस्समिल्ला महिला बचत गटांना प्रत्येकी दिड लाख रुपयांचे कर्ज वाटप केले.
यावेळी कँशियर एस.एस.स्वामी,बँक ऑफिसर कांबळे , सुरज गायकवाड, बँकमित्र आमीत लोंढे, महिला बचत गटाच्या सिआरपी विद्या राजेंद्र बिराजदार, रमाई महिला बचत गटाच्या सचिव गीता झेंडारे,ठकुबाई वाघमारे, कविता गायकवाड, स्वाती गायकवाड,आदीसह महिला उपस्थित होत्या. बँकेने केलेल्या अर्थ सहाय्याबद्दल बचतगटातील महिलातून समाधान व्यक्त केले जात आहे.