नळदुर्ग  , दि . १४

 नळदुर्ग येथील कै.अब्दुल गणी बाडेवाले यांचे नातु व अब्दुल मुखैद बाडेवाले यांचे सुपुत्र अब्दुल मुसेब बाडेवाले  यांची नौदलात  लेफ्टनंट कमांडर  म्हणून पदोन्नती झाली आहे.



लेफ्टनंट कमांडर अब्दुल मुसेब बाडेवाले हे मूळचे नळदुर्ग चे रहिवासी असुन नौदलात असणारे एकमेव वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांना हा मान मिळाला आहे. त्यांनी डिसेंबर २०१६  मध्ये नौदल  अधिकारी म्हणुन सामील झाले होते.  आज त्यांनी नौदल वरिष्ठ अधिकारी बनण्याचे आपल्या आजोबा व वडिलांचे स्वप्न पुर्ण केले आहे.त्याचे वडील अब्दुल मुखैद बाडेवाले हे देखील सैन्यात आर्मी सिग्नल कोर व महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभागात  एकूण ३६ वर्ष सेवा केली आहे. आपल्या सुपुत्राने देशसेवेची परंपरा पुढे चालवली असल्याचा तसेच आपल्या जिल्ह्याचे व ऐतिहासिक नळदुर्ग शहराचे नावलौकिक केले. याबद्दल आपल्याला आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे.अब्दुल मुसेब बाडेवाले हे सध्या कोची (केरळ) समुद्र तटावर नियुक्तीस आहेत.
 
Top