नळदुर्ग , दि . १३ : विलास येडगे
येथिल श्री क्षेत्र रामतीर्थ येथे भाविकांना बसण्यासाठी ११ सिमेंटचे बाकडे नळदुर्ग येथील आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने भेट दिले आहे. या बाकड्यावर अतीशय सुंदर सुविचार लिहिण्यात आले आहेत. आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या या कार्याचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.
आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही नळदुर्ग शहरातच नव्हे तर परीसरात सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. कोरोनाच्या काळात या संस्थेने गोरगरीब नागरीकांसाठी केलेले कार्य प्रशंसनीय आहे.त्याचबरोबर शहराची गरज लक्षात घेऊन आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने शहरवासीयांसाठी अतीशय सुंदर असा "वैकुंठ रथ" उपलब्ध करून दिला आहे.त्याचबरोबर पर्यावरण व वृक्ष लागवडीतही या संस्थेचे कार्य मोठे आहे.
नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे सध्या दररोज भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दर शनिवार व गुरुवारी या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. मंदिर परीसर वृक्षाने बहरलेला आहे. त्याचबरोबर हे क्षेत्र प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र आहे. त्यामुळे या मंदिरात आल्यानंतर भाविकांचे मन प्रसन्न होते. मात्र भाविकांना याठिकाणी बसण्याची आसन व्यवस्था नव्हती. हे लक्षात येताच आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने तात्काळ याठिकाणी भाविकांसाठी ११ सिमेंटचे बाकडे उपलब्ध करून दिले आहेत. दि.१२ मार्च रोजी हे बाकडे मंदिर समितीच्या प्रमुखांकडे सुपुर्द केले आहेत. श्रीलंका येथे झालेल्या कराटे स्पर्ध्येत भारताला सुवर्णपदक मिळवुन देणारी प्रणिता मोहन पवार हिच्या हस्ते या बाकड्यांचे पुजन करण्यात आले.यावेळी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरंभ सामाजिक संस्थेचे ऍड. धनंजय धरणे, कैलास घाटे, अभिजित लाटे,भिमाशंकर बताले अभिषेक सुरवसे, महेश सोलंकर राहुल हजारे (अध्यक्ष),विशाल डुकरे (उपाध्यक्ष),श्रमिक पोतदार (सचिव),अभय हजारे (सहसचिव) व सागरसिंग हजारे (कोषाध्यक्ष) यांनी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे भाविकांसाठी हे बाकडे भेट दिले आहेत.