नळदुर्ग , दि . ०८ : विलास येडगे


श्रीलंकेत झालेल्या  कराटे स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूला हरवुन भारताला सुवर्णपदक मिळवुन देणारी प्रणिता पवार ही केवळ बंजारा समाजाची लेक नसुन ती भारताची लेक असल्याचे  पोहरादेवी संस्थानचे शेखर महाराज यानी तुळजापूर तालुक्यातील रामतिर्थ येथे प्रणिता मोहन पवार याच्या घरी भेटीप्रसंगी बोलताना सांगितले.



तुळजापुर तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथील प्रणिता मोहन पवार या मुलीने श्रीलंका येथे पार पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्युपल्स ऑलिंपिक स्पर्धेत कराटे मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूला हरवुन भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. मात्र सध्या तिची परिस्थिती अतीशय हालकीची आहे. प्रणिताल सर्व स्तरांतुन मदत मिळत आहे. दि.७ मार्च रोजी बंजारा समाजाचे शक्तीपीठ असलेल्या पोहरादेवी संस्थानचे व संत रामराम महाराजांचे नातु शेखर महाराज हे रामतीर्थ तांड्यात जाऊन प्राणिताची भेट घेऊन तीला आर्थिक मदत करण्याबरोबरच तीला यापुढील काळात सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
      


प्रणिता पवार हिची माहिती मिळाल्यानंतर शेखर महाराज हे दि.७ मार्च रोजी रामतीर्थ तांड्यात आले त्यांनी प्रणिता पवारच्या घरी जाऊन तीची व तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत जि. प.सदस्य प्रकाश चव्हाण, प्रा. डॉ. राहुल जाधव,रामतीर्थचे सरपंच बालाजी राठोड, गुरुदेव राठोड, दामाजी राठोड, नामदेव पवार ताराचंद पवार, लक्ष्मण राठोड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बळीराम जाधव, गौतम राठोड,नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, प्रसिद्धीप्रमुख शिवाजी नाईक, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, सतीश राठोड आदीजन उपस्थित होते.


     
शेखर महाराज यांनी प्रणिता पवार हिच्यासह तीची आई श्रीमती इंदुबाई पवार, बहीण सुप्रिया पवार, भाऊ सुमित पवार व आजोबा शिवाजी पवार यांची भेट घेऊन त्यांची विचारपुस करून त्यांना आशिर्वाद दिला. कोरोनामुळे वडिलांचे निधन झाल्यानंतर प्राणिताच्या घरची परिस्थिती पालटुन गेली. आई दुसऱ्याच्या शेतात मजुरीने गेल्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होऊ लागला. अशावेळी प्राणिताची कराटेचा सराव बंद झाला. यावर्षी प्रणिता दहावीला आहे. शाळेला सुट्टी असल्यानंतर प्राणिताही आईबरोबर कामाला जाऊ लागली. एका सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची ही अवस्था कुणालाही पाहवत नव्हती.
     

प्रणिताची विचारपुस केल्यानंतर बोलतांना म्हटले की प्रणिता ही बंजारा समाजासाठी भुषण तर आहे. शिवाय आपला विरोधक असणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूला हरवुन भारतासाठी सुवर्णपदक जिकले त्यामुळे ती खऱ्या अर्थाने भारताची कन्या ठरली आहे. प्राणिताच्या या यशाची दखल केंद्र व राज्य सरकारने घेण्याची गरज आहे. आज अनेकांकडून प्रणिताल मदतीचा हात मिळत आहे. मात्र यापुढील काळात बंजारा समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रणिताला मदत करावी. पोहरादेवी संस्थानच्या वतीने प्रणिताच्या पुढील कराटेच्या शिक्षणासाठी चांगल्या कोचची तसेच अकॅडमीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचेही शेखर महाराज यांनी म्हटले आहे.
    

यावेळी जि. प.सदस्य प्रकाश चव्हाण यांनीही प्रणिताला शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याबरोबरच तीला आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी रामतीर्थ तसेच अलियाबाद येथील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
 
Top