नळदुर्ग , दि . १७ : विलास येडगे

नळदुर्ग येथील प्रतिष्ठित व्यापारी व व्यापारी मंडळाचे सदस्य सुनिलसिंह हजारी यांचे नुकतेच दीर्घ आजाराने  निधन झाले आहे. ते दिवगंत माजी नगराध्यक्ष शितलसिंह हजारी यांचे सुपूञ होते.
        

सुनिलसिंह हजारी हे गेल्या कांही दिवसांपासुन आजारी होते. त्यांच्यावर सोलापुर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दि.१५ मार्च रोजी नळदुर्ग येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अलियाबाद स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय,सामाजिक,व्यापार क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना व नातवंडे असा परीवार आहे.
      
त्यांच्या निधनाबद्दल शहर व्यापारी मंडळाच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
Top