वागदरी , दि . १८ :एस.के.गायकवाड


 तुळजापूर तालुक्यातील गुजनूर येथे तालुका  कृषी कार्यालय तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ  कृषी कार्यालय नळदुर्गच्या वतीने खरीप हंगाम पूर्व नियोजन-२०२२ अंतर्गत खरीप हंगामातील पेरणी पूर्व तयारी व खरीप हंगाम ग्राविकास आराखडा बाबत बैठक संपन्न झाली.


मौजे गुजनूर येथे दि.17 एप्रिल  रोजी खरीप हंगामातील पिक पेरणी पूर्व तयारी या संदर्भात आराखडा बैठक घेण्यात आली.या बैठकीत खरीप हंगामातील पिक पेरणी पूर्व तयारी संदर्भात ग्राम विकास कृषी आराखडा बाबत चर्चा झाली.विशेषतःखरीप हंगामातील  सोयाबीन पिकाची पेरणी करण्यासंदर्भात  कृषी सहाय्यक आर.एन. मते ,व जितेंद्र माने यांनी मार्गदर्शन केले.
  

याप्रसंगी बोलताना  कृषी सहाय्यक आर.एन.मते यांनी सांगितले की सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी शक्यतो बाजारात मिळणाऱ्या महागड्या सोयाबीन बियणाचा उपयोग न करता घरच्या   सोयाबीन बियाणांचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवहान केले.
  
तसेच यावेळी PMFME या योजनेची सखोल माहिती ही त्यांनी दिली. यावेळी कृषी सहाय्यक  मते ,जितेंद्र माने,तुकाराम नागमोडे. श्रीकृष्ण पाटील जनार्दन पाटील, नामदेव मोरे, आणाप्पा मुलगे,व इतर शेतकरी उपस्थित होते.
 
Top