वागदरी , दि . १८ : 

विद्यार्थी व ग्रामस्थांची प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन तुळजापूर ते अक्कलकोट व्हाया नळदुर्ग एसटी.बससेवा पूर्ववत चालू करावी अशी मागणी भाजपा मिडिया सेलचे तुळजापूर तालुका अध्यक्ष किशोर धूमाळ सह ग्रामस्थानी केली आहे.
  

भाजपा मिडिया  सेलचे तुळजापूर तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ यांनी यासंदर्भात नळदुर्ग बसस्थानकाचे वहातुक नियंत्रक ज्योती दस मार्फत राज्य परिवहन महामंडळाचे तुळजापूर आगार प्रमुख यांना एक लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळी ,शहापूर, दहिटणा, गुजनूर,वागदरी, नाईकनगर पाटील तांडा, येडोळा आदी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता व  ग्रामस्थाना दैनंदिन व्यवहारासाठी नळदुर्गलाच यावे लागले.सध्या तुळजापूर,नळदुर्ग, अक्कलकोट या मार्गावरील एसटी बस सेवा बंद असल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांची येण्या जाण्याची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन या मार्गावरील बससेवा त्वरीत पूर्ववत करावी. 

  यावेळी रिपाइंचे (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के गायकवाड, रिपाइंचे नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, अनिल वाघमारे, काशिनाथ सोमवंशी, विलास कोरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top