काटी , दि . ०९ :
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथे शाळा पूर्व तयारी उपक्रम२०२२- २०२३ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षी पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या पालकांचा पालक मेळावा दि .१३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून या पालक मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक डोलारे व मुख्याध्यापिका सोनार व गावातील सर्वच अंगणवाडी ताई यांनी केले आहे .
राज्य शासन व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या सूचनेनुसार प्रत्येक शाळेतील शिक्षक व पालक यांनी एकत्र येऊन पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीयांच्या सर्वांगीण विकासासाठी व कोरोना काळात झालेले त्यांचे अंगणवाडीतील नुकसान भरून काढण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे यामुळे या मेळाव्यासाठी इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक , शिक्षक , अंगणवाडी ताई व शाळा व्यवस्थापन समिती यांनी केले आहे
शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा-मुख्याध्यापक
मंगरूळ येथील जिल्हा परिषद शाळेचे मैदान अतिशय प्रशस्त व तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे मैदान असून हा परिसर सुंदर व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी गावातील प्रत्येक नागरिकांनची असून हे मैदान व परिसर स्वच्छ ठेवावा व या विद्या मंदिराची शोभा वाढवावी