तुळजापूर , दि . १० :
शुक्रवार दि.8 एप्रिल रोजी तुळजापूर तहसील कार्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत "जागो ग्राहक जागो" या विषयावर तुळजापूर येथील आशिष फंड यांची कन्या कु.सुष्मिता आशिष फंड तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनींने द्वितीय क्रमांक पटकावला.
या यावेळी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे तसेच नायब तहसीलदार संदीप जाधव, शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळ तसेच पालकांमधून अभिनंदन केले जात आहे.