काटी , दि . १० :


तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भीमनगरमधील बुद्ध विहारात न्यु सिध्दार्थ तरुण मंडळाच्या वतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी नुकतीच बुध्द विहार मध्ये झालेल्या बैठकीत सर्वानुमते उत्सव समितीची निवड करण्यात आली.


 यावेळी सर्वांच्या वतीने 131वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भोलेनाथ बाळासाहेब बनसोडे यांची तर उपाध्यक्षपदी अप्पासाहेब भिमराव बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत खजिनदारपदी दशरथ गेणा बनसोडे,सह खजिनदार-सचिन पाडुंरंग बनसोडे,सचिव-दयानंद दादाराव डोळसे, सहसचिव विशाल जितेद्रं मस्के,सल्लागार नंदु साधु बनसोडे, जितेद्रं अशोक बनसोडे याची निवड करण्यात आली आहे. 
 
Top