काटी , दि.१३
काटी.ता.तुळजापुर येथील प्राथमिक शाळेत शाळापुर्व तयारी पालक मेळावा व प्रभात फेरी उत्साहात संपन्न.
सुरुवातीला शालेय परिपाठ घेण्यात आला.त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांसह गावातुन पालक जागृतीसाठी व जुन मधील इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रभातफेरी काढण्यात आली..मोगल गल्ली,माळी गल्ली मार्ग बाजार चौक ,बस स्थानक परिसर ,काझी गल्ली,धनगर गल्ली,ग्रामपंचापत परिसरातुन प्रभातफेरी उत्साहात संपन्न झाली.त्यानंतर शाळेत सात टेबल मांडुन शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्यात आली.गावातुन आलेल्या पालकांचे व नुतन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व बिस्किटपुडे देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर त्यांना शारिरीक,बौध्दीक विकास,सामाजिक व भाषिक विकास,गणनपुर्व तयारी,भौमित्तीक आकार समजावुन सांगण्यात आले.त्यांची नोंद घेण्यात आली.कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.शेवटी शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक पंकज कासार काटकर सर तर आभार प्रदर्शन अजित इंगळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती .कांबळे दैवशाला आणि मुख्याध्यापक सत्यवान रसाळ सर यांनी मेहनत घेतली.