वागदरी , दि . १३

महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मध्यानभोजन योजनेचा शुभारंभ नळदुर्ग येथे आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांच्या हस्ते व लष्कर ए भिमा सामाजिक संघटनेच्या पुणे शहराध्यक्षा छाया कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत  आर.पी.आय.शहराध्यक्ष दत्ता बनसोडे यांच्या निवासस्थानी  करण्यात आला.



 महाराष्ट्र शासनाने असंघटित कामगारासाठी मध्यान्नभोजन देण्याची योजना सुरू केलेली असून उस्मानाबाद जिल्ह्यात गुनिना कमर्शियल प्रा.ली. व महाराष्ट्र शासनान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव आर.एस.गायकवाड यांच्या पुढाकाराने नळदुर्ग येथील कामगारांना मध्यान भोजनाची सोय करण्यात आली असून  सदर योजनेचा शुभारंभ रिपाइंचे नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
  याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते नामदेव  बनसोडे, रिपाइंचे एस.के.गायकवाड, महादेव कांबळे,प्रकाश बनसोडे आदीसह कार्यकर्ते, कामगार उपस्थित होते
 
Top