नळदुर्ग , दि . १३ :
शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर (नळदुर्ग) येथे शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा विविध कार्यक्रमाने संपन्न झाला.
बुधवारी सकाळी बॅनर, ढोल, ताशा, व घोषवाक्य फलकासह गावातून शिक्षक, पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व नागरीकासह प्रभात फेरी काढून वातावरण निर्मिती करण्यात आली. सकाळी ठिक ९ वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवि माणिक राठोड, उपाध्यक्ष रेशमा मोहन राठोड, सदस्य ज्योती दगडू पवार, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण, पत्रकार अजित चव्हाण यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून, श्रीफळ अर्पण करण्यात आले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक आर.आय. औसेकर शिक्षक शिरगुरे, सुरवसे, कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित सर्व माता पालकांचे स्वागत शिक्षिका व्ही.एल.वाघमारे यांनी केले. त्यानंतर मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सन २०२२-२३मधील प्रवेश पात्र विद्यार्थी व पालक यांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि प्रवेश पात्र बालकाचे टोप घालून पुष्पगुच्छ देऊन व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. मेळाव्यात एकूण सात स्टॉल मांडण्यात आले होते. १.नाव नोंदणी स्टॉल २.शारीरिक विकास स्टॉल ३ बौद्धिक विकास स्टाॅल ४ भावनिक व सामाजिक विकास स्टाॅल ५ भाषिक विकास स्टॉल ६ गणन पूर्वतयारी क्षमता स्टाॅल ७ मार्गदर्शन विभाग अशा एकूण सात स्टॉलवर विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांचे विकास कार्ड भरून घेण्यात आले अशाप्रकारे सर्व उपस्थित पालक-बालक यांचे नावे नोंदवून उपस्थिती घेण्यात आली.
या मेळाव्यास विद्यार्थी पालक व नागरिकांनी उत्सर्फुत प्रतिसाद दिला. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वायकर बी.टी, एम.शिरगुरे, एच.एम. सुरवसे, एस.जी कुलकर्णी सी.एल. वाघमारे, संगीता सुरेश राठोड, आशा लक्ष्मण गायकवाड, सुनीता धनराज राठोड, रोहिणी तानाजी गायकवाड, वैजयंता विठ्ठल लोंढे, अंजना दयानंद जाधव आणि स्वयंसेविका म्हणून तेजस्विनी राजकुमार शिंदे, स्वाती श्रीमंत शिंदे, वैष्णवी राजकुमार शिंदे आदीनी पुढाकार घेतला.