काटी , दि. १३
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि. (13 )रोजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.
सुरुवातीला विदयार्थी व शिक्षक यांनी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य पालक व शिक्षक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नवीन वर्षात शाळेत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले शाळेच्या परिसरात सात टेबल ठेवून नवीन दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक विकास तसेच गणनपूर्व तयारी व भाषिक क्रिया विकास शरीरिक विकास यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी गावातील पालक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी शाळेच्या शिक्षिका नंदिनी क्षीरसागर जि प शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अश्विनी काळदाते व सहशिक्षक ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.