काटी , दि . १३

तुळजापूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नरसिंहवाडी क्रमांक 2 येथील शाळेत दिनांक 13/4/2022 रोजी शाळापूर्व  तयारी मेळावा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडला.प्रथमतः मुलांना घेऊन गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली.यानंतर प्रवेशपात्र विद्यार्थीनीच्या मातोश्री रेश्मा किरण जाधव यांच्या हस्ते फीत कापून मेळव्याचे उदघाटण करण्यात आले.यानंतर भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.


सर्व प्रवेशपात्र मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर सात टेबल लावुन प्रवेशपात्र मुलांचे विकासपत्र भरण्यात आले.शेवटी प्रवेशपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक यांना साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन   जामगांवकर  यांनी केले तर कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी अंगणवाडीच्या शिक्षिका श्रीमती सुनिता पंके ,मदतनीस श्रीमती आंबुबाई चव्हाण  व स्वंयसेवकांचे सहकार्य लाभले.यावेळी गावातील पालकही उपस्थित होते.
 
Top