काटी , दि . १३
बुधवार दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमवाडी येथे शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.
प्रथमतः विदयार्थी व शिक्षक यांनी मिळून गावातून प्रभात फेरी काढली.त्यानंतर सरपंच,उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्यास सुरुवात झाली.शाळेत दाखल होणाऱ्या प्रवेशपात्र सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळेच्या परिसरात सात टेबल ठेवून नवीन दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक विकास तसेच गणनपूर्व तयारी व भाषिक क्रिया विकास यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमप्रसंगी सर्व शालेय विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत तर्फे बिस्किट वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी गावचे सरपंच राजेंद्र डोलारे,उपसरपंच गौरीशंकर नकाते,मुख्याध्यापक एन.आर धनशेट्टी , पालक ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधु-भगिनी, अंगणवाडीताई सौ.फंड,सौ.नकाते ,सौ.डोलारे यांनी परिश्रम घेतले.