नळदुर्ग , दि . १३ :
मंगळवारी राञी नळदुर्ग परिसरात वादळी वा-यासह पाऊस झाला. यावेळी हगलुर शिवारात जयकुमार नेहरु घुगे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या संकरीत जर्सी गायीवर अचानक वीज कोसळली . या घटनेत गाय जागीच ठार झाली. माञ पंधरा दिवसाचे वासरु सुदैवाने वाचला आहे. ही घटना मंगळवारी राञी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. शेतक-याचे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन शासनाने शेतक-यास नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी होत आहे.