वागदरी , दि . १४ :

तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा ता.तुळजापूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .



प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित  चव्हाण
यांच्या हस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून व सामुदायिक  बुद्ध वंदना घेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. 
 

 याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी पोलीस पाटील शाहूराज पाटी,माजी सरपंच प्रभाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते  दिनकर पाटील, दिगंबर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुका सचिव रवी पाटील,उपसरपंच सौ. लक्ष्मी जाधव, शिवसेना नेते राजेंद्र जाधव (मेजर),
जि.प.प्रा.शाळा येडोळाचे मुख्याध्यापक राहुल जाधव,जयंती कमेटीचे अध्यक्ष देवानंद लोंढे, सचिव अमित लोंढे, अमर जेटीथोर, रमेश लोंढे, लक्ष्मण लोंढे, राम लोंढे, प्रवीण कांबळे, भानुदास लोंढे, मारुती लोंढे, विजयानंद लोंढे ,सुरज गायकवाड, अर्जुन लोंढे, अभिषेक लोंढे,रवी कांबळे, तुकाराम भीमनगर बौद्ध उपासक उपासिका यांच्यासह कार्यकर्ते  उपस्थित होते..
 
Top