चिवरी ,दि . ०७

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे 
ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ५ रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार  निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी चंद्रकांत निवृत्ती गायकवाड, तसेच मोतीराम सिद्राम चिमणे यांची   अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्षपदी झाल्याबद्दल तर आधुनिक लहुजी सेनेचे तालुका कोर कमिटीपदी दशरथ देडे यांची निवड  झाल्याबद्दल  त्यांचा सत्कार करण्यात आला.


 यावेळी सरपंच अशोक घोडके उपसरपंच बालाजी पाटील, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, तानाजी जाधव, सचिन शिंदे,भिमा देडे, विवेकानंद पाटील, पप्पू भुजबळ, ब्रह्मानंद इंगळे, जयपाल सिंग बायस ग्रामपंचायत लिपिक अनिल  देडे आदी उपस्थित होत.  
 
Top