वागदरी , दि . ०८
गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेल्या एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर उच्च न्यायालयाने तोडगा काढल्याने नळदुर्ग येथील बसस्थानकात एस.टी.कर्मचाऱ्यानी फटाक्यांची आतिषबाजी करित लाडूचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
प्रारंभी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून "कामगार एकजूटीचा विजय आसो" अशा घोषणा देत फटाक्यांची आतीषबाजी करीत लाडूचे वाटप करून एस.टी.कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी एस.टी.कर्मचारी नेताजी मुळे म्हणाले की, न्यालयाच्या निर्णयाचा आदर करीत आम्ही कामावर रुजू होणार असलोतरी ही एस.टी.महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करावे ही आमची मागणी कायमस्वरूपी राहणार आहे.
यावेळी नळदुर्ग शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागणीसाठी जन आंदोलन करणारे संजय बताले,एस.टी.कर्मचारी रामेश्र्वर घोडके, राजकुमार वैद्य, विजयकुमार कांबळे, नारायण दोपारे,संभाजी महबोले,आयुब नदाफ,गुंडू डुकरे,नेताजी मुळे, मुकुंद वैद्य, संतोष कोकणे,आजमतअली कुरेशी, हाशम कुरेशी, बाळासाहेब कांबळे कमलाकर कोळी, अण्णाराव बनसोडे, ज्योती दस,विजय डूकरे, जयकुमार गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.