नळदुर्ग, दि. ०८ :
नंदगाव ता.तुळजापूर एका विवाहित तरुणीस अत्महात्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या चौघाविरुध्द मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरणाप्पा काशिनाथ काशेट्टी रा. आलुर ता. उमरगा यानी नळदुर्ग पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , माझी मोठी बहीण सोनाली उर्फ गंगाबाई (वय 28 वर्षे) हिचे लग्न नंदगाव ता. तुळजापूर येथील विदयासागर अमृत कामशेट्टी याच्याशी सन 2012 मध्ये मानपान देवून लग्न झाले. तिला एक मुलगा व एक मुलगी असे असून लग्न झाल्यापासून मुलासह सासरी नंदगाव येथे राहते. तिला नवरा विदयासागर कामशेटटी, नणंद मोहनबाई, श्रीशैल्य मनगुळे, राहुल श्रीशैल्य मनगुळे (तिघे रा. सापळा ता. अक्कलकोट), सुजाता दत्ता रगबल्ले (रा. आरळी, ता. तुळजापूर) हे तिला शेतातील गडयासोबत का बोलतेस असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. त्यामुळे नवरा तिच्यासोबत भांडण तक्रार करुन तिला शारिरीक व मानसिक त्रास देत होता. त्याचबरोबर वरील लोक त्रास देत होते. या त्रासास कंटाळून दहा ते पंधरा दिवसापूर्वी कोणतेतरी विषारी औषध पिवून मरण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सासरच्यानी आम्हाला कळविले नाही. मात्र नंदगाव मधील पाहुण्याकडून माहिती मिळाली. चार ते पाच दिवसापूर्वी तिचा सासरा वृध्दापकाळाने मृत्यू झाल्याने आम्ही अंत्यविधीला नंदगाव येथे आलो होतो. त्यावेळी मला नवरा व नणंद तसेच नणंदचा मुलगा माझ्यावर वाईट संशय घेवून शिवीगाळ करुन मारहाण करीत आसल्याचे सांगितले . यावेळी आम्ही तिची समजूत घातली होती. दि. 6 एप्रिल रोजी सायंकाळी माझे भावजी विदयासागर कामशेटटी यांनी तुझी बहीण सोनाली घरातुन पळून गेली आहे. त्यानंतर नंदगाव येथे येवून संपूर्ण परिसर फिरुन शोध घेतलो असता शिलवंती तलावाजवळ आम्हाला बहिणीची चप्पल दिसली. दुस-या दिवशी तलावाच्या पाण्यात सोनाली हिचे मृतदेह तरंगताना दिसल्याने पोलीसाना फोन केला. वरील नमूद लोकांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेवून वारंवार शिवीगाळ व मारहाण करुन मानसिक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळून तिने तलावाच्या खोल पाण्यात उडी मारुन पाण्यात बुडून मयत झाली. वरील लोकांनी तिला आत्महत्यास प्रवृत्त केले, अशी पोलीसात तक्रार शरणाप्पा काशिनाथ काशेट्टी रा. आलुर ता. उमरगा यानी नळदुर्ग पोलीसात तक्रार दिल्याने वरील चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.