जळकोट , दि.१४ :                                                                    

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानमोडी येथे शाळा पूर्वतयारी अभियान भाग एक हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


 यावेळी या कार्यक्रमास सरपंच सौ. रेणुका कदम, कार्यक्रमाचे अध्यक्ष सरोजा शिंदे, प्रमुख पाहुणे सौ. जयश्री पवार, प्रियंका पवार, सौ. सुषमा कदम आदी  उपस्थित होते . प्रथमत: आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व स्वागत गीत घेण्यात आले .त्यानंतर पुढील वर्षी इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या सर्व बालकांचा सन्मान तथा त्यांना खाऊवाटप करण्यात आला. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  विक्रम पाचंगे  यांनी शाळापूर्व तयारी संदर्भात पालकांना तथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रथम  श्रीमती सुचिता चव्हाण,  रमेश दूधभाते,  रामकृष्ण मोहिते यांनी वेगवेगळ्या क्षमतांच्या आधारे पालकांना व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे डेमो दाखवले .काही पालकांचे मनोगत यावेळी घेण्यात आले. मोठ्या उत्साहातमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. गीत तथा वेगवेगळ्या घोषवाक्य याने सर्व गाव दुमदुमून गेले होते.अशा पद्धतीने मानमोडी शाळेमध्ये शाळापूर्व तयारी अभियान भाग एक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 
Top