चिवरी /काळेगाव दि . ११

 तुळजापूर तालुक्यातील येवती येथे दिनांक 10 रोजी  सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा झालेल्या पावसामुळे गावातील  घरांचे तर शेतशिवारातील गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.


 वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर काही भागात विद्युत खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता, नुसकानग्रस्त घराचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी  त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे तसेच शेतातील नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुसकान भरपाई देण्यात येईल असे सांगितले.  


यावेळी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, शिवसेना तालुका उपप्रमुख शाम पवार,अमोल गवळी, उपसरपंच प्रीतम गायकवाड, चेअरमन अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राम गवळी, तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस समाधान ढोले, तलाठी पाटील, ग्रामसेवक कोकाटे, कृषी अधिकारी दूधभाते, कार्यकारी अभियंता गुजर,  सहाय्यक अभियंता म्हमाने, यशवंत बडूरे ,काका शिंदे, बाळासाहेब चव्हाण, भगवान  बडूरे, आकाश गवळी, बाळू गवळी, रोहिदास गवळी  ,आदीसह  ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top