नळदुर्ग , दि . ०४ : सुहास येडगे
नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे सदस्य व गंधोरा ता. तुळजापुर येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेले उत्तम बनजगोळे हे २८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा नळदुर्ग येथे शहर पत्रकार संघटना, मैलारपुर कट्टा व मित्र परिवाराच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
उत्तम बनजगोळे हे गंधोरा येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात सन १९९४ साली लिपिक म्हणुन सेवेत रुजु झाले. तेंव्हापासुन म्हणजे सलग २८ वर्षे ते त्या एकाच शाळेत लिपिक म्हणुन काम केले. एक प्रामाणिक व अभ्यासु लिपिक म्हणुन त्यांची ओळख आहे. त्यामुळेच ते एकाच शाळेत २८ वर्षे काम करू शकले. दि.३१ मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार केला जात आहे.
नळदुर्ग येथे शहर पत्रकार संघटना, मैलारपुर कट्टा व मित्र परिवाराच्या वतीने उत्तम बनजगोळे यांचा मैलारपुर येथील श्री खंडोबा मंदिरात सपत्निक सत्कार करण्यात आला.
शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे,उपाध्यक्ष श्रीनिवास भोसले,नगरसेवक विनायक अहंकारी, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, अमर भाळे,माजी नगरसेवक सुधीर हजारे,भाजपाचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे,अजित चव्हाण, लतिफ शेख, सुनिल बनसोडे, मैलारपुर कट्टयाचे रघुनाथ नागणे, सतीश मोटे, राजेंद्र महाबोले,उमेश जाधव, राजेंद्र मोटे, परिचारिका सुमन फुले, बनजगोळे यांचे जावाई राज मक्तेदार, सोमेश बनजगोळे, यांनी उत्तम बनजगोळे यांचा सपत्निक सत्कार केला.