वागदरी , दि . १२:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटी वागदरी ता.तुळजापूरच्या अध्यक्षपदी उत्तम झेंडारे तर सचिवपदी निवृत्त पोलीस हवालदार संदीपान वाघमारे यांची निवड करण्यात आली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त वागदरी येथील समाजमंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीची निवड करण्यात आली असून जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२८ एप्रिल २०२२ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सहवाद्द भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
यावेळी निवडण्यात आलेली जयंती उत्सव कमिटी पुढील प्रमाणे अध्यक्ष उत्तम झेंडारे, उपाध्यक्ष माजी सरपंच नागनाथ बनसोडे, सचिव संदिपान वाघमारे, सहसचिव चंद्रकांत वाघमारे, दत्तू वाघमारे , खजिनदार गुरूनाथ वाघमारे, आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुतन जयंती उत्सव कमिटीचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.