जळकोट, दि.१२ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संभाजीनगरमध्ये हिंदू एकता संघाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने व धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
श्रीराम नवमीनिमित्त हिंदू एकता संघाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात सकाळी दहा ते बारा या वेळेत श्री रामाचा पाळणा हलवण्यात आला. यात असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. दुपारी एक ते चार या वेळेत रामपाठ घेण्यात आला. सायंकाळी सहावाजता श्रीराम मूर्तीला महाभिषेक करण्यात आला. सायंकाळी सात वाजता भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीराम नवमीदिवशी संभाजीनगर भागात भगवे ध्वज लावण्यात आले होते.
श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीचे मोहन डांबरे, प्रीतम बेडगे, धनंजय मडोळे, प्रविन नरूणे, ज्ञानेश्वर साखरे, शरद पवार, अप्पू बंडगर, नितीन डांबरे, प्रदीप जाधव, बालाजी पालमपल्ले, सचिन माळगे, विशाल जाधव, संगमेश्वर सगर, अंकुश वाडीकर, अनिरुद्ध चव्हाण, रवी पवार, नागेश जाधव, तम्मा कुंभार, बंटी मेंगशेट्टी, राम सोनटक्के, मनोज सावंत, अभिजीत हासुरे, प्रतीक बेडगे, मंगेश सुरवसे, रमेश कुंभार, सचिन गंगणे, सुनील हिंडोळे, मनोज जाधव, बालाजी डांबरे, योगेश कुंभार, सागर राजमाने, नीलेश पोतदार, कार्तिक साखरे, विशाल घोरपडे, ज्ञानेश्वर बंडगर आदि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.