ताज्या घडामोडी

काटी , दि . ११ : 


तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि. (11) रोजी येथील भीमनगरमधील  न्यु सिध्दार्थ तरुण मंडळाच्या वतीने बुद्ध विहारात  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  

सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष भोलेनाथ बनसोडे, उपाध्यक्ष अप्पासाहेब बनसोडे, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, दलितमित्र नंदु बनसोडे,ग्रा.पं.सदस्य अनिल बनसोडे आदी  मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
       

यावेळी बोलताना दलितमित्र नंदु बनसोडे यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी बहुजनांचे अज्ञान, दारिद्र्य व समाजातील जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला असल्याचे सांगून समाजातील अज्ञान दुर करण्यासाठी पहिली मुलींची  शाळा उभी करून स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करणारे स्त्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
       

  यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष भोलेनाथ बनसोडे, उपाध्यक्ष अप्पासाहेब बनसोडे, ग्रा.पं.सदस्य अनिल बनसोडे, दलितमित्र नंदु बनसोडे, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, अशोक बनसोडे, शेका साबळे, दशरथ बनसोडे, सत्यवान जाधव, दादाराव डोळसे,उमेश बनसोडे, संतोष घोंगडे, पांडुरंग बनसोडे, सचिन बनसोडे, साहिल साबळे, आबा साबळे, बबलू सोनवणे, तेजस बनसोडे, दत्ता बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top