तुळजापूर , दि. २४ :
तुळजापूर खुर्द येथील तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य शिखराच्या कळसारोहन कार्यक्रमासाठी २६ ते २८ दरम्यान कर्नाटकातील करवीर संस्थानचे शंकराचार्य स्वामी संकेश्वर यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
या निमित्ताने सुवासिनी महिला जलकुंभ घेऊन कळस मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत. या कार्यक्रमामध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष प्रा. विलास जगदाळे यांनी केले आहे.
श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजापूर खुर्द या परिसरात असणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या शिखर बांधकामाचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओमराजे निंबाळकर ,आमदार राणाजगजितसिंह पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व तालुक्याचे आरोग्य अधिकारी यांच्यासह तुळजापूरचे सर्व माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहाणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची सविस्तर माहिती सांगितली. सदर पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष प्रा विलास जगदाळे, हनुमंत साबळे, बापूसाहेब भोजने, बाबुराव माळी, शरद जगदाळे, सूर्यभान ढवळे गुरुजी, गणेश ननवरे , प्रमोद भोजणे यांची उपस्थिती होती.
२६ एप्रिल रोजी या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी कर्नाटकातील संकेश्वर पिठाचे जगद्गुरु श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नर्सिंग भारती यांची प्रमुख उपस्थिती आहे. याशिवाय तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचे महंत वाकोजी महाराज व महंत मावजीनाथ महाराज यांची उपस्थिती आहे. येथील आचार्य नागेश शास्त्री अंबुलगे आणि इतर अकरा ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत होम हवन व इतर धार्मिक विधी पार पडणार आहे. अपसिंगा येथील शिल्पकार संभाजी आलमले यांनी हे शिखर मागील दोन वर्षापासून अपार कष्ट घेऊन निर्माण केले आहे. यानिमित्ताने संस्थानच्या वतीने सदर कलावंतांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. मुख्य शिखर व त्याचे कळस काम करणे अत्यंत कठीण असल्यामुळे या कलावंतांना काम करण्यासाठी अनेक अडचणी आल्या परंतु निर्धाराने या कलावंतांनी अडचणीवर मात करून सदर काम उत्तम रित्या पूर्ण केल्याचा निर्वाळा यावेळी अध्यक्ष प्रा विलास जगदाळे यांनी दिला. आर्थिक दृष्ट्या सदर कामासाठी अनेक समस्या असताना देखील लोकवर्गणी आणि देणगी मधून हे काम पूर्ण झाले असून या कामामध्ये अजित नाईक, नागेश नाईक, एडवोकेट संजय पवार, योगेश प्रयाग, विश्वास चव्हाण, शाम भोजने, वसंत मेत्रे गुणवंत एकदंते यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. याशिवाय इतरानी देखील आपापल्या परीने सहकार्य केले आहे. म्हणून हे काम पूर्ण होऊ शकले असेही यावेळी प्रा. जगदाळे यांनी सांगितले.
२७ एप्रिल रोजी सुवासिनी महिला आणि भाविक भक्त यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून जलयात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे पारंपारिक वाद्य सहभागी होत आहेत. आराधी गोंधळी वारकरी आणि भावी फक्त या ज्याला यात्रेमध्ये सहभागी होत आहे. याशिवाय २८ एप्रिल रोजी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार आहे.
तुळजापूर खुर्द येथील उद्धव राव नाईक कालिदास साबळे सूर्यभान ढवळे गुरुजी हनुमंत साबळे या मंडळींनी अहोरात्र उद्या निधी संकलनाचे काम केले आहे या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सात हजार लोकांचे भोजन आणि दहा हजार चौरस मीटर मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील सर्व नागरिक ग्रामस्थ भाविक भक्तांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष प्रा विलास जगदाळे यांनी यानिमित्ताने केले आहे. शेवटच्या दिवशी कार्यक्रमाच्या शेवटी आकाशामध्ये शोभेच्या दारूची घोषणाही करण्यात येणार आहे.