काटी, दि. २४

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गटात  पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता शिंदे यांच्या वतीने व मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई,एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल मोहंमदवाडी,हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.



मंगळवार दि.२६ रोजी तामलवाडी,बुधवार दि.२७ रोजी सुरतगाव, गुरुवार दि.२८ रोजी सांगवी काटी, शुक्रवार दि.२९ रोजी पिंपळा खुर्द, शनिवार दि.३० रोजी पिंपळा बुद्रुक,दि.१ मे रोजी देवकुरुळी,२ मे रोजी तामलवाडी येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ घ्यावा.तसेच तामलवाडी येथुन पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणे येणे व मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.असे या शिबीराचे आयोजक दत्ता शिंदे यांनी कळविले आहे.रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल,मोहंमदवाडी, हडपसर पुणे येथे करण्यात येतील.
 
Top